'ज्यांच्या नेत्यांचा श्वास मंदिरात घुसमटतो व नाइट लाइफमुळे फुलतो ते...'; भाजपचा सेनेवर घणाघाती आरोप

Zoom In Zoom Out Read Later Print

कोरोनासारख्या जीवघेण्या संकटामध्ये भाजपने राज्यभर मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन केलं. यावर आज सामनातून जहरी टीका करण्यात आली. याच टीकेला आता भाजपकडूनही चोख प्रत्यूत्तर आलं आहे.

मुंबई, 31 ऑगस्ट : कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन असलेलं राज्य एकीकडे अनलॉक होत असताना दुसरीकडे मात्र भाजप सरकार मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलं आहे. यामुळे कोरोनाचं संकट बाजूलाच पण सत्ताधारी आणि विरोधक असं सत्तानाट्य उभा महाराष्ट्र पाहत आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या संकटामध्ये भाजपने राज्यभर मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन केलं. यावर आज सामनातून जहरी टीका करण्यात आली. याच टीकेला आता भाजपकडूनही चोख प्रत्यूत्तर आलं आहे.

'ज्यांच्या नेत्यांचा श्वास मंदिरात घुसमटतो आणि नाईट लाईफमुळे फुलतो त्यांची वृत्तपत्रं मंदिरं बंदीच्या बाजूनेच बोलणार' अशी आक्रमक टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपच्या आंदोलनावर जहरी टीका करण्यात आली. 'भाजपचं घंटानाद आंदोलन हे धार्मिक होतं की राजकीय?' असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आला. त्यावर भातखळकर यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.

अजून पहा

नवे फोटो