एलएसीवर चीनसोबतच भारतीय सैनिकांचा कोरोनाशीही लढा

Zoom In Zoom Out Read Later Print

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य सीमेवर खडा पहारा देत आहेत. मात्र त्याच वेळी चीनमधूनच जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरससोबतही सैनिकांचा लढा सुरु आहे. भारतीय सैन्यात आतापर्यंत 16 हजार 758 सैनिकांना कोरोनाची लागण झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

लडाख : एलएसीवर चीनचा सामना करण्यासोबतच भारतीय‌ सैन्य कोरोनाशीही लढत आहे. कारण देशाच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात सैनिक पूर्व लडाखमध्ये पोहोचत आहेत. मात्र भारतीय सैन्य कोरोनाबाबात पूर्णत: सतर्क आहे. कोरोनाविरुद्ध भारतीय सैन्याची तयारी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजची टीम मिलिट्री ट्रान्झिशन फॅसिलिटी इथे पोहोचली, जिथे मोठ्या प्रमाणात सैनिक दाखल होत आहेत. भारतीय सैन्यामध्ये जवळपास 17 हजार कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी 32 सैनिकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

सिव्हिल एअरपोर्टच्या टर्मिनलप्रमाणेच एमटीएफ म्हणजेच मिलिट्री ट्रान्झिशन फॅसिलिटी हे एअरबेसचं टर्मिनल असतं. इथे सगळ्या सैनिकांना सर्वात आधी एका रांगेत बसवलं जातं, मग प्रत्येकाची कोरोनाच्या प्राथमिक तपासणीसाठी थर्मल स्क्रीनिंग केली जाते. थर्मल स्क्रीनिंगनंतरच सैनिकांना लेहमधील ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाठवलं जातं. एमटीएफ टर्मिनलवर ठिकठिकाणी कोरोनापासून बचावासाठी पोस्टर लावण्यात आले आहेत. सैनिकांचं सामान एमटीएफवर पोहोचल्यावर सॅनिटाईज करुनच पुढे पाठवलं जातं.


मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व लडाखच्या प्रत्येक युनिट आणि छावणीत कोरोनाबाबत कठोर प्रोटोकॉल आहेत. छावणीच्या बाहेरच डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ पुन्हा एकदा त्यांची थर्मल स्क्रीनिंग करतात, मगच त्यांना फॉरवर्ड लोकेशनवर पाठवलं जातं.


जानकारी के मुताबिक, मात्र फॉरवर्ड लोकेशनवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अतिशय कठीण होतं. परंतु कोणालाही कोरोनाची लक्षणं असतील तर तातडीने याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा एएससी म्हणजेच आर्मी मेडिकल कोअरला द्यावी, असे स्पष्ट निर्देश सर्व सैनिकांना देण्यात आले आहेत.


संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी कालच (16 सप्टेंबर) एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात लोकसभेत सांगितलं होतं की आतापर्यंत भारतीय सैन्यातील 16 हजार 758 सैनिकांना कोरोनाची लागण झाली असून 32 सैनिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हवाई दलाचे 1 हजार 356 एअरमनलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर नौदलातील हा आकडा 1 हजार 716 आहे. हवाई दलात आतापर्यंत 3 एअरमनचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सुदैवाना नौदलात कोरोनामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अजून पहा

नवे फोटो