मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच, भाजपची याचिका फेटाळली!

Zoom In Zoom Out Read Later Print

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच राहणार आहे. विरोधी पक्ष नेतेपदासाठी भाजपने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे काँग्रेसचे रवी राजाच विरोधी पक्षनेते राहतील यावर शिक्कामोर्तब झालं.

मुंबई : मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या सत्ता काळात मित्रपक्ष असलेल्या भाजपने राज्यात सत्ता समीकरणे बदलल्यावर महापालिकेत विरोधाची भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते पदावर दावा करत भाजपने उच्च न्यायालयात धाव घेतली. महापालिकेच्या नियमाप्रमाणे काँग्रेसला देण्यात आलेले विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडेच राहणार की भाजपाकडे जाणार याबाबतचा निकाल न्यायालय देणार असल्याने राजकीय पक्षांच्या नजरा उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागल्या होत्या. आज भाजपचा दावा फेटाळत मुंबई महापालिकेचे विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडेच राहणार यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.


अजून पहा

नवे फोटो