ईव्हीएम चोरी प्रकरणी तिघांचे निलंबन! केंद्रीय निवडणूक आयोगाची कारवाई

Zoom In Zoom Out Read Later Print

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसीलदार कार्यालयातून चोरीला गेलेल्या ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पुरंदर तालुक्याचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

तसेच मुख्य सचिवांनी तात्काळ केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनादेखील तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. या EVM चोरी प्रकरणांमध्ये आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून तीन अधिकाऱ्यांला निलंबित करण्यात आलं आहे. पुरंदरच्या प्रांताधिकारी वैशाली लांडगे-खत्री, तहसीलदार विक्रम राजपूत तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्ड यांना निलंबित करण्यात आले आहे

अजून पहा

नवे फोटो