नरेंद्र मोदींची लोकप्रियता देशासमोरचे प्रश्न सोडवू शकेल का?

Zoom In Zoom Out Read Later Print

भारतीय राजकारणी कधीच निवृत्त होत नाहीत. मात्र, वयाची सत्तरी ओलांडत असताना सर्वांचं लक्ष आता पंतप्रधान नरेंद्र मोदी इथून पुढे कसे मार्गक्रमण करतात आणि त्यांना कुठल्या आव्हानांचा सामना करावा लागेल, याकडे असणार आहे.

भाजपमध्ये नेत्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीचं वय 75 वर्षं आहे. त्यामुळे इथून पुढची काही वर्षं मोदी जो वारसा मागे ठेवणार आहेत, तो कोण समर्थपणे पेलू शकेल, हे ठरवण्यासाठी महत्त्वाची असणार आहेत.

याचाच अर्थ समजा मोदींनी निवृत्ती घेतलीच तर त्या निवृत्तीसाठी त्यांच्याकडे अजून पाच वर्षं आहेत आणि पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार वर्षं आहेत.

  • पत्रकारांनी विचारलेल्या अडचणींच्या प्रश्नांना नरेंद्र मोदी कसे सामोरे जातात?
  • 'सावधानी हटी तो दुर्घटना घटी'; मोदींच्या 'मन की बात' मधील 15 मुद्दे

मात्र, वयाची 70 वर्षं पूर्ण करत असताना मोदींची स्वप्न आणि भविष्य यात तीन विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत - अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण आणि राजकारणाची त्यांची स्वतःची शैली. मोदी विरोधकांच्या मते मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात असंतोष वाढला, अर्थव्यवस्था गडगडली, ध्रुवीकरण आणि सत्तेचं केंद्रीकरण झालं.

तर दुसरीकडे अनेकजण मोदींच्या राज्यकारभारच्या पद्धतीचं समर्थनही करतात. मोदींच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचं उच्चाटन झालं आणि गरीब-वंचितांपर्यंत खऱ्या अर्थाने मदत पोहोचली, असं त्यांचं मत आहे.

अजून पहा

नवे फोटो