माझा न्युड फोटो हा माॅर्फ केलेला- रणवीर सिंग

Zoom In Zoom Out Read Later Print

न्यूड फोटोशूटप्रकरणी अडचणीत आलेल्या अभिनेता रणवीर सिंग याने याप्रकरणी अजब खुलासा केला आहे. आपण सोशल मीडियावर शेअर केलेल्या सात फोटोंपैकी एक फोटो त्याच्या पोस्टचा भाग नव्हता. त्या फोटोसोबत छेडछाड करण्यात आली आहे, असे रणवीरने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

न्यूयॉर्कमधील एका मासिकासाठी रणवीरने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलीच खळबळ माजली होती. काहींनी त्याच्या या बोल्ड फोटोशूटवर आक्षेप घेत चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी 29 ऑगस्टला रणवीरने पोलिसांसमोर आपला जबाब नोंदवला आहे. रणवीरच्या म्हणण्यानुसार, त्याने इन्स्टाग्रामवर सात फोटो पोस्ट केले होते आणि ते अश्लील नव्हते. ज्या फोटोत त्याला न्यूड दाखवलेय तो फोटो फोटोशूटचा भाग नव्हता, तो मॉर्फ करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी हे फोटो फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात फोटो मॉर्फ केलेला आहे की रणवीरने खरंच न्यूड फोटोशूट केले हे स्पष्ट होईल.

अजून पहा

नवे फोटो