कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन

Zoom In Zoom Out Read Later Print

मुंबई 21 सप्टेंबर: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची झुंज अखेर अपयशी ठरली. राजू श्रीवास्तव यांचं एम्स रुग्णालयात निधन झालं.  ते 58 वर्षांचे होते.  त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर गेल्या ४१ दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. ते व्हेंटिलेटरवर होते.  त्यांच्यावर डॉक्टरांची मोठी टीम उपचार करत होती. मात्र आज अखेर राजू श्रीवास्तव यांची प्राण ज्योत मालवली.

डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड म्हणून घोषित केलं होतं. आज त्यांच्या हृदयाचे ठोके मंदावल्यानं त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. हिंदी सिनेसृष्टीत अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अजून पहा

नवे फोटो