स्वर्गीय गोविंदराव निकम जयंती महोत्सव सोहळा

Zoom In Zoom Out Read Later Print

विज्ञान प्रदर्शन गायन,स्पर्धा वक्तृत्व व निबंध स्पर्धा व सह्याद्री प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान, शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग -असित रेडीज

सावर्डे - शिक्षण हे मानवी प्रगतीचा पाया असून स्वर्गीय गोविंदराव निकम यांनी खडतर परिस्थितीत शिक्षणाचे गंगा खेडोपाड्यापर्यंत पोहोचवली व  समाज उन्नतीचा मार्ग कोकण वासियांसाठी रचला. आज या जयंतीनिमित्त सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्रत्येक माध्यमिक विद्यालयात मोफत अभिनय मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्याच्या संकल्प कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोनी टीव्हीचे दिग्दर्शक, अभिनेते,विविध मालिकांचे निर्माते असित रेडीज यांनी केला. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा असेही आवाहन केले.
 याप्रसंगी विचार मंचावर सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम संस्थेचे विश्वस्त शांताराम खानविलकर,सचिव महेश महाडिक, प्रमुख पाहुणे असित रेडीज, उद्योजक प्रशांत निकम, सुरेश चिपळूणकर, शौकत माखजनकर, चित्रकार प्रकाश राजेशिर्के, सभापती पूजा निकम, अंजलीताई चोरगे युगंधरा राजेशिर्के, सर्व निकम कुटुंबीय संस्थेचे पदाधिकारी पंचक्रोशीतील पालक हितचिंतक व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    खेर्डी विद्यालयातील आर्या ठाणे सिंगापूर स्पेस कॅम्प साठी निवड, वेदा शिंदे व श्रेया चाळके राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी राष्ट्रीय स्तरासाठी निवड,सावर्डे विद्यालयाच्या आयुष पवार व ओम तेटांबे उच्च प्राथमिक विद्यार्थी प्रतिकृती राज्य विज्ञान प्रदर्शनासाठी निवड, संचिता कदम माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साधन राज्य विज्ञान प्रदर्शनासाठी निवड, हेदली सवेनी विद्यालयाची मानसी शिंदे इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात राष्ट्रीय पातळी निवड व सहभाग या विज्ञान क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
     गेली पाच वर्षापासून सह्याद्री विज्ञान मंचच्यावतीने सह्याद्री प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते यामध्ये ओम पवार खेर्डी प्रथम, आर्या नांदवडेकर सावर्डे द्वितीय, आदित्य पाध्ये इंग्लिश मीडियम सावर्डे तृतीय,जतिन मेहता आंबडस चौथा, यश पवार खेर्डी पाचवा, सेजल कळमकर सहावा, आर्या गमरे सावर्डे सातवा,गौरव जाधव खेर्डी आठवा, ओम भुवड हेदली नववा, मैथिल शिंदे टाळसुरे दहावा या विद्यार्थ्यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेतील इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत असलेल्या 1000 विद्यार्थ्यांच्या मधून नंबर प्राप्त केला आहे या परीक्षेत एकूण 150 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सवय लागावी व प्रेरणा मिळावी या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने केले जाते.
 सृष्टी तांबे गायन क्षेत्रात लिटिल व्हॉइस या स्पर्धेत रत्नागिरीमध्ये विजेती, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित शासन कला उत्सव शास्त्रीय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक, विविध ऑनलाइन गायन स्पर्धेत यश,गायन परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन हार्मोनियम वाद्यांमध्ये प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सृष्टी तांबेचा गौरव करण्यात आला. ही विद्यार्थिनी गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असून नुकताच चतुरंगच्यावतीने दिला जाणारा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारही तिला जाहीर झाला आहे.
  स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित विज्ञान प्रदर्शनामध्ये संस्थेतील 28 विद्यालयातील 28 प्रतिकृती सहभागी झाल्या होत्या सलग पाचव्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये समृद्धी महाडिक हेदली सवेणी,प्रथम क्रमांक,वेद गोरिवली टाळसुरे स्नेक स्टिक द्वितीय,आयुष पवार इलेक्ट्रिक डिटेक्टर सावर्डे तृतीय क्रमांक, मानवी सिंग मॅंग्रोव्हज इंग्लिश मीडियम खेर्डी चतुर्थ क्रमांक,समृद्धी लाड खंडोत्री सोलर ग्रास कटर ने पाचवा क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
    सलग दहा वर्षापासून स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या जयंती निमित्ताने सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डे तर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. जिल्ह्यात या स्पर्धा आयोजित करणारी ही एकमेव प्राथमिक शाळा आहे विद्यार्थ्यांना बालपणापासूनच निबंध लेखनाचे व वक्तृत्व कलेची ओळख व्हावी म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. निबंध स्पर्धेमध्ये पियुष बाष्टे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासे नंबर दोन प्रथम क्रमांक, श्रीवल्लभ थत्ते आर.सी.काळे प्राथमिक विद्यालय पेढे परशुराम द्वितीय क्रमांक, ईशान गोखले जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा नारदखेरकी नंबर एक तृतीय क्रमांक प्राप्त केला असून मैत्री डाकावे इंग्लिश मीडियम स्कूल पाग, आरोही करंजकर प्राथमिक शाळा सेमी इंग्लिश अंबडस, स्वरा कडव प्राथमिक शाळा खेर्डी सती, श्लोक शिंदे प्राथमिक शाळा सावर्डे या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेने उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले आहे.
वक्तृत्व स्पर्धेत वेदांत महाडिक सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी प्रथम क्रमांक, प्रेम पांचाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली नंबर एक द्वितीय क्रमांक, मेहुल कुलकर्णी सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डे, शौर्य पोटे सह्याद्री संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी, मुग्धा गोताड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासे, वेदिका माळी आर सी काळे प्राथमिक विद्यालय पेढे परशुराम,या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले.
 जयंती महोत्सवाच्या अवचित अजून संस्थेतील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळावी म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

अजून पहा

नवे फोटो