"कोणी डोळ्यात पाणी आणेल.. भावनिक होऊ नका.. लोकसभेसह विधानसभेलाही माझ्या विचारांच्या उमेदवाराला मतदान करा"

Zoom In Zoom Out Read Later Print

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदारकीला मिठाचा खडा लागल्यास आमदारकीला मी वेगळा विचार करेन बारामतीच्या विकासाला गती द्यायची आहे की विकासाला खीळ घालायची आहे हे तुम्ही ठरवा असे अजित पवार यांनी बारामतीकरांना सुनावले.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न होईल.कुणी डोळ्यामधी पाणी आणतील मात्र भावनिक न होता लोकसभेला व विधानसभेलाही माझ्या विचारांच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.बारामती येथील व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

काहीजण म्हणतील आमदारकीला त्यांना व खासदारकीला आम्हाला मतदान करा मात्र तसे चालणार नाही. एक तर त्यांना करा किंवा मला मतदान करा . आपल्या विचारांचा खासदार निवडून आला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित भाईंना मी सांगू शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध होऊ शकतो असेही अजित पवार म्हणाले.

लोकसभेला राष्ट्रवादीच्या पहिल्या आहेत तेवढ्या जागा मिळणार आहेत. त्यापैकी बारामतीच्या जागेवर माझ्या विचारांचा खासदार निवडून द्या .पक्षातून वेगळी भूमिका घेतल्यानंतर 50 खोके असे एक अक्षर आमच्याबद्दल निघाले नाही. कारण राष्ट्रवादीतील प्रत्येक आमदार खासदाराची ती भूमिका होती असही पवार यावेळी म्हणाले.

अजून पहा

नवे फोटो